Beginner Spoken English course 1 + 2 FAQ

नमस्कार
इंग्लिश शिकण्यासाठी पहिले पाऊल उचलल्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन. या पुढील शिक्षणाचा तुमचा प्रवास सुकर आणि मनोरंजक व्हावा याची खास काळजी आम्ही घेतलेली आहे.
फ्रेंड्स मी तुमच्या मदतीसाठी काही नेहमी विचारले जाणारे अत्यंत महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे लिहिली आहेत. ती तुम्ही एकदा तरी वाचायलाच हवी!!
पण त्याआधी तुम्ही आपले अँप कसे वापरायचे हा विडिओ बघाच! 👇

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न :लॅपटॉप वरती कोर्स कसा बघायचा ??

उत्तर :https://web.classplusapp.com/

या लिंक वरती क्लिक करा. –> ORG कोड टाका – awdvh –> तुमचा फोन नंबर टाका –> फोन वरती एक OTP येईल तो टाका. –>त्यानंतर स्क्रीनच्या वरच्या भागात स्टोर वरती क्लिक करा तुम्हाला तुम्ही घेतलेला कोर्स दिसेल.

प्रश्न : बॅच कोड काय आहे? / मला बॅच मध्ये ऍड करा / मला बॅच कोड मिळाला नाही!

उत्तर : बॅच कोड काहीही नाही. तुम्ही ग्रुप मधले मेसेजेस बघू शकता म्हणजे तुमचा कोर्स चालू झाला आहे. तुम्हाला ग्रुप मध्ये घेण्यात आले आहे.

प्रश्न : मी आत्ताच कोर्स सुरु केला मला काहीही कळत नाहीये

उत्तर : अँप कसे वापरायचे यावर सविस्तर माहिती मी या लिंक वरील विडिओ मध्ये दिली आहे.  LINK

प्रश्न :Iphone अँप आहे का ?

उत्तर : हो App Store LINK

👉Org code – awdvh

प्रश्न : Ma’am लाईव्ह क्लास कधी घेणार आहेत? लाईव्ह क्लास ला मला जॉईन करून घ्या!!

उत्तर : फ्रेंड्स हा रेकॉर्डेड कोर्स आहे. या कोर्स साठी तुम्हाला लाईव्ह क्लास जॉईन करायची गरज नाही.

जे मी लाईव्ह शिकवू शकते त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त चांगले मी या कोर्स मध्ये शिकविलेले आहे. कोर्स रेकॉर्डेड असल्यामुळे तुम्ही तो तुमच्या वेळेनुसार कधीही शिकू शकता.

आणि तुमच्या मनातील इंग्लिश विषयी चे प्रश्न आपण या ग्रुप वरती विचारू शकता.

** ग्रुप सुरु असल्यास तुम्हाला नोटिफिकेशन येईल.

प्रश्न : home work काय आहे?

उत्तर : home work म्हणजेच तुम्हाला दिलेल्या सूचना आणि टेस्ट्स तुम्ही सोडवणे.

प्रश्न : अँप उघडल्यावरती हा मेसेज येतोय (Please turn off USB debugging mode) किंवा (please turn off developer options)

उत्तर :हा प्रॉब्लेम तुमच्या फोन पुरता मर्यादित आहे त्यामुळे याचे निरसन तुम्ही स्वतः करू शकता त्यासाठी हा विडिओ बघा. LINK 

किंवा जवळच्या मोबाइल शॉप मध्ये जाऊन सांगा ते कदाचित तुमची मदत करू शकतील.

फ्रेंड्स मला एका दिवसाला हजारोंमध्ये मेसेजेस येत असतात. त्यामुळे सर्वांच्या शंकेचे निरसन करणे मला शक्य होत नाही. त्यामुळे मी तुम्हाला रिप्लाय दिला नाही म्हणून चिडून जाऊ नका! वरील दिलेली सगळी माहिती तुमच्या मदती साठीच आहे. मला आशा आहे कि या मध्ये तुमच्या खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील. या पेक्षा हि काही वेगळ्या समस्या असतील तर तुम्ही ०२०७११९००११ या नंबरवरती संपर्क साधू शकता.